भारतात केला जातो 'या' इमोजीचा सगळ्यात जास्त वापर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

फेसबुकवर लव्ह इमोजी सगळ्यात जास्त वापरली जाते. सध्या इमोजींची संख्या 2800 एवढी आहे.

आज 17 जुलै म्हणजे वर्ल्ड इमोजी डे आहे. 2014 पासून इमोजी दिवस साजरा केला जातो. जेरेमी बर्ज यांनी विकिपीडिया पारमाणेच इमोजीपीडिया (Emojipedia) बनविले होते. 

सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माणसाच्या प्रत्येक भावनेसाठी आज इमोजी उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, टॅब, संगणक या सगळ्या इंटरनेट हाताळण्याच्या उपकरणांमध्ये काही इमोजी इनबिल्ड केलेले असतात तर आपल्या सोयीप्रमाणे ते आपण डाउनलोडही करु शकतो. एक नवीन प्रकारच्या संवाद प्रक्रियेचा इमोजीने उगम झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या दिवसाचं निमित्त साधत इमोजींविषयी काही मनोरंजक माहीती आणि आकडेवारी प्रसिध्द केली आहे. फेसबुकवर 'लव्ह इमोजी' सगळ्यात जास्त वापरली जाते. सध्या इमोजींची संख्या 2800 एवढी आहे. पैकी 2300 इमोजी रोज फेसबुकवर वापरल्या जातात. तर फेसबुक मेसेंजर वरुन रोज 90 कोटींहून अधिक इमोजी एकमेकांना पाठवल्या जातात. फेसबुक पोस्टमद्ये 70 कोटींहून अधिक इमोजींचा वापर केला जातो. नवीन वर्षाला इमोजींचा सर्वाधिक वापर केला जातो. 

इमोजी केवळ सोशल मिडीयावरच वापरले जातात असे नाही बरं का. केक, मेणबत्त्या, उशी, खेळण्याचे बॉल, टॉवेल्स यांवर सुध्दा इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 
 

 

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: World Emoji Day News