भारतात जगातील सर्वात मोठी Covid 19 लसीकरण मोहीम - PM नरेंद्र मोदी

pm-modi
pm-modi

नवी दिल्ली - कोरोनाविरोधात जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतामध्ये राबविली जाणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

‘मेड इन इंडिया’ मोहिमेसाठी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करताना ते म्हणाले की, ‘‘ देशाला या सर्वांचा अभिमान आहे.’’ ते आज नॅशनल मेटरोलॉजी कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते. मेड इन इंडिया उत्पादनांना केवळ वैश्‍विक मागणीच नाही तर वैश्‍विक स्वीकारार्हता देखील आहे. येथे प्रमाणापेक्षाही गुणवत्तेला अधिक महत्त्व आहे. आमच्या प्रमाणाबरोबरच गुणवत्ता देखील वाढायला हवी. आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच देश अधिक मजबूत होऊ शकतो. तंत्रज्ञान हे नवे उद्योग आणि संशोधनाला प्रोत्साहन देत असते. ही सायकलच देशाला पुढे नेते. आम्हाला अवघ्या जगाला भारतीय उत्पादनांनी भरायचे नाही, पण जगाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांची मने मात्र जिंकायची आहेत. देशातील खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील सेवा आणि उत्पादनांची गुणवत्ता देशाची जगातील ताकद सिद्ध करतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com