भारत, दक्षिण आफ्रिकेकडे जग आशेने पाहतेय : सुषमा स्वराज 

पीटीआय
शुक्रवार, 8 जून 2018

दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांसाठी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांनी केलेल्या कामाची आठवण करत जग भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडे याच भूमिकेतून आशेने पाहत असल्याचे प्रतिपादन आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. 

पीटमारित्झबर्ग (दक्षिण आफ्रिका) : दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांसाठी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांनी केलेल्या कामाची आठवण करत जग भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडे याच भूमिकेतून आशेने पाहत असल्याचे प्रतिपादन आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. 

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पेट्रीच स्थानक ते पीटमारित्झबर्गपर्यंत रेल्वेने प्रवास केला. पीटरमारित्झबर्ग येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. 7 जून 1893 च्या ऐतिहासिक घटनेच्या 125 वर्षपूर्तीनिमित्त सिटी हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात स्वराज म्हणाल्या, की महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांनी अन्यायाविरोधात लढणाऱ्या नागरिकांना बळ देण्याचे कार्य केले. दक्षिण आफ्रिकेत 7 जून 1893 रोजी तरुण वकील मोहनदास करमचंद गांधी यांना वर्णद्वेषावरून आरक्षित डब्यातून उतरविण्यात आले होते. 

Web Title: World looks up to India and South Africa for providing leadership says Sushma Swaraj