महिला दिन 2019 : लोकांची साखरझोप; आमची कामासाठी धावपळ

महिला दिन 2019 : लोकांची साखरझोप; आमची कामासाठी धावपळ

बेळगाव - आपले घर आपण स्वच्छ ठेवतो. मात्र, शहर आणि परिसर स्वच्छतेचे काम सफाई कर्मचारी करतात. यात महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा अाहे. पहाटे लवकर कामे उरकून साडेपाचला स्वच्छतेसाठी बाहेर पडणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मात्र, कुटुंबाची कामे बाजूला ठेवून बारा महिने काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सुविधा देण्याची गरज असूनही सरकार लक्ष देत नाही. तरी प्रतिकूल परिस्थितीतही  महिला कर्मचारी कार्यरत आहेत. पहाटे लवकर बाहेर पडावे लागत असल्याने घरातील कामांचे नियोजन करण्यातही या महिला आघाडीवर आहेत.

शहर आणि परिसरात रोज सुमारे अडीच ते तीनशे टन कचरा जमा होतो. अनेकजण जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकण्यात आघाडीवर असतात. त्यामुळे रोज कचरा उचल होणे आवश्‍यक असते. कचरा उचल करण्यास थोडासा 
उशीर झाला तरी लोकांमधून ओरड सुरू होते. 

मात्र स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. याचा विचार कोणीही करीत नाही. विषेशत: महिला कर्मचाऱ्यांना पहाटे लवकर घराबाहेर पडावे लागत असल्याने घरातील अनेक कामे त्यांना दूर ठेवावी लागतात. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा डबा आणि इतर कामांचे नियोजन करताना महिला वर्गाला मोठे कष्ट  घ्यावे लागतात. तसेच महिनाभर काम काम करूनही पगार देण्यास विलंब, केला जातो. तरीही महिला कर्मचारीवर्ग आपल्या कुंटुबाचा कार्यभार व्यवस्थितरित्या सांभाळत असतात, त्यामुळेच महिला कर्मचाऱ्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

पहाटे साडेपाचला घरातून कामानिमित्त बाहेर पडतो. काम करताना अनेक अडचणी येतात. साडेपाचला बाहेर पडल्यानंतर काही प्रमाणात काम संपवून सकाळी दहाला घरी येतो. त्यानंतर घरातील थोडेसे काम आवरून पुन्हा कामावर जावे लागते. 
- लक्ष्मीदेवी साके

पहाटे साडेचारला उठून कामे आवरून साडेपाचला घराबाहेर पडते. दिवसभर कष्टाचे काम करावे लागत असले तरी ज्या सुविधा हव्‍यात, त्या मिळत नाहीत. सरकारने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर कराव्‍यात.
- लुधियम्मा चिंता

२८ वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. आठ तास काम करून त्यानंतर घराकडील कामांकडेही लक्ष द्यावे लागते. काबाडकष्ट करणाऱ्या महिलांना अधिक सुविधा मिळाव्‍यात. पगार वेळेत मिळावा, असे वाटते. 
- कस्तुरी मेत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com