'डॉक्‍टर मूर्ख बनवत आहेत', इमानच्या बहिणीचा आरोप

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

वजन कमी व्हावे यासाठी सध्या मुंबईत उपचार घेत असलेली जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला इमान अहमदच्या बहिणीने इमानवर करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत प्रश्‍न उपस्थित करत डॉक्‍टरांवर आरोप केले आहेत. 'डॉक्‍टर आम्हाला मूर्ख बनवित आहेत', असा आरोप तिने केला आहे.

मुंबई : वजन कमी व्हावे यासाठी सध्या मुंबईत उपचार घेत असलेली जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला इमान अहमदच्या बहिणीने इमानवर करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत प्रश्‍न उपस्थित करत डॉक्‍टरांवर आरोप केले आहेत. 'डॉक्‍टर आम्हाला मूर्ख बनवित आहेत', असा आरोप तिने केला आहे.

इमानवर सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, इमानची बहिण शायमा सेलिमने इमानवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांवर आरोप केला आहे. इमानच्या प्रकृतीविषयी आणि तिच्या प्रकृतीत होत असलेल्या सुधारणांविषयी डॉक्‍टर मुफाझल लकडावाला योग्य ती माहिती देत नसल्याचा आरोप शायमाने केला आहे. शायमा म्हणाली, 'इमानच्या प्रकृतीत किंचितही सुधारणा झालेली नाही. गेल्या दीड महिन्यांपासून तिची प्रकृती गंभीर आहे.' दरम्यान डॉ. लकडावाला यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि शायमावरच आरोप केले आहेत. इमानला इजिप्तमध्ये परत घेऊन जाण्यास पुरेसे पैसे नसल्याने शायमा असे प्रकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

इजिप्तमधील इमान अहमद या महिलेचे 500 किलो वजन होते. तिला उपचारांसाठी 11 फेब्रुवारीरोजी विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. दरम्यान मुंबईत आल्यानंतर अवघ्या महिनाभरातच कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय तिचे वजन 120 किलोने कमी केल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला होता. मात्र शायमाने केलेल्या आरोपांमुळे याविषयी प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

कोण आहे इमान अहमद?
इमानचा जन्म 1980 साली झाला. जन्मावेळी तिचे वजन तब्बल पाच किलो होते. तिला थायरॉइडचा त्रास होता. त्यामुळे तिला शालेय शिक्षणही थांबवावे लागले. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्‍यक ते उपचार घेण्यासाठी तिला विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. पहिल्या मजल्यावरील तिच्या घराची भिंत फोडून 40 फूट अंतरावरील ट्रकमध्ये टाकून तिला विमानतळापर्यंत पोचविण्यात आले. तिच्यावर उपचारासाठी दानशूरांनी मदत केली आहे.

Web Title: World's heaviest woman Eman Ahmed's sister calls Dr Muffazal Lakdawala a 'liar'