जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक शक्तीशाली 'टॉप 10' व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले आहे. फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलल्या या यादीत नवव्या क्रमांकावर नरेंद्र मोदी यांचे नाव आहे.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सलग चौथ्या वर्षी यादीतील पहिले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनाही दहाव्या क्रमांकावरील स्थान मिळाले आहे. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची दखल या यादीमध्ये घेण्यात आलेली आहे. यंदाच्या वार्षिक यादीमध्ये जगातील 100 कोटी लोकांमधून एका व्यक्तीची निवड करण्यात आली असून अशा 74 सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींचा यात समावेश आहे, असे फोर्ब्जने म्हटले आहे. या यादीत रोमन कॅथलिक चर्चचे पोप फ्रान्सिस, बिल ऍण्ड मेलिंदा गेटस्‌ फाऊंडेशनचे बिल गेटस्‌, गुगलचे संस्थापक आणि "अल्फाबेट'चे अध्यक्षलॅरी पेज यांचाही समावेश आहे.

Web Title: The World's Most Powerful People 2016