द्वेषाच्या राजकारणाला पाठिंबा नाही : ममता

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

ग हे एक मोठे कुटुंब आहे. विविध देशांचे नागरिक विविध देशांत रहात असतात हे आपण समजून घेतले पाहिजे

कोलकता - अमेरिकेत झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येबद्दल आपल्याला धक्का बसल्याचे स्पष्ट करीत आपला द्वेषाच्या राजकारणाला पाठिंबा नसल्याचे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

भारतीय अभियंत्याची झालेली हत्या दुर्भाग्यपूर्ण असून त्याबद्दल आपल्याला धक्का बसला आहे. आम्ही अशा प्रकारच्या द्वेषाच्या राजकारणाला कधीच पाठिंबा देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जग हे एक मोठे कुटुंब आहे. विविध देशांचे नागरिक विविध देशांत रहात असतात हे आपण समजून घेतले पाहिजे. आपला देश सोडून जा अशा घोषणा देत एकाने या 32 वर्षांच्या भारतीय अभियंत्यावर गोळीबार करण्यात आला त्यात त्याचा मृत्यू झाला तर त्याचा एक साथीदार जखमी झाला. हे एक दहशतवादी कृत्यच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: would not support politics of hatred, says mamata