राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा...: Wrestler Protest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh Tikait

Wrestler Protest: राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा...

Wrestler Protest: दिल्लीमध्ये आंदोलन करत असलेल्या ऑलिम्पिकविजेत्या महिला कुस्तीपटूंना भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच या खेळाडूंबाबत चर्चेसाठी ९ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दिल्लीत झालेल्या एका बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. (Wrestler Protest Rakesh Tikait Ultimatum to Modi Govt till June 9)

टिकैत म्हणाले, "सरकारकडं ९ जूनपर्यंतचा वेळ आहे. सरकारला कशा पद्धतीनं पीडित कुस्तीपटूंशी चर्चा करायची आहे ती त्यांनी करावी. आमची मुलं (कुस्तीपटू) खूपच दुःखी आहेत. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. आमचं पहिलं प्राधान्य आहे की, सरकारनं या कुस्तीपटूंवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. तसेच कथीत आरोपी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करु" (Latest Marathi News)

जेव्हा शेतकरी आंदोलन सुरु होतं. तेव्हा आम्ही देशभरात पंचायत भरवल्या होत्या. आत्ता आम्ही तशा प्रकारे देशभरात पंचायत करणार नाही. कारण सध्या देशात सध्या या महिला कुस्तीपटूंबाबत सहानुभूती आहे. ब्रिजभूषण सिंहांना पहिल्यांदा अटक झाली पाहिजे. यापुढच्या आंदोलनाची देखील आम्हाला तयारी करायची आहे. (Marathi Tajya Batmya)

कारण १२ तारखेला आमची एक पंचायत आहे. त्यानंतर १६, १७, १८ तारखेला देखील पंचायत घेणार आहोत. जर यानंतरही काही झालं नाही तर संपूर्ण देशभरात पंचायत सुरु होतील. दरम्यान, भाजपच्या नेत्यांना लोक सारखे प्रश्न विचारले जातील. शांततेत आम्ही सर्व आंदोलन करणार आहोत, असं राकेश टिकैत म्हणाले तर ९ जूनला जंतरमंतरवर मेळावा होईल त्यानंतरच आंदोलनाला देखील सुरुवात होईल, असंही यावेळी राकेश टिकैत यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं.