Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ रामदेव बाबा सरसावले; म्हणाले तात्काळ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestlers Protest

Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ रामदेव बाबा सरसावले; म्हणाले तात्काळ...

भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर देशातील नामांकित महिला पैलवानांनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या पैलवानांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय नेते उतरले. मात्र आता योगगुरू बाबा रामदेव यांनी ब्रिजभूषण सिंग विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

बाबा रामदेव यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देताना म्हणाले की, कुस्ती संघटनेच्या अध्यक्षावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप आहेत. त्याला तात्काळ अटक करावी. देशातील कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर बसून कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप करणे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा व्यक्तींना तात्काळ अटक करून तुरुंगात पाठवावे. बाबा रामदेव यांनी ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी तर केलीच, पण त्यांच्या वक्तव्यावरून भाजप खासदारावर निशाणा साधला.

लोकसंख्या नियंत्रणावर रामदेवबाबांचा खास सल्ला!

योगगुरू रामदेव बाबा यांनी शुक्रवारी लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "आता देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करायला हवा.

देशाची सध्याची परिस्थिती पाहता लोकसंख्येचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे, त्यामुळे देशाच्या संसदेत लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे" असं रामदेव बाबा यांनी भाष्य केलं.

योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, लोकसंख्या 140 कोटींवर पोहोचली आहे आणि देश यापेक्षा जास्त भार उचलू शकणार नाही. रेल्वे, विमानतळ, कॉलेज, विद्यापीठात तेवढ्याच लोकांना रोजगार देऊ शकलो तरी पुरेसं आहे.

लोकसंख्या नियंत्रण कायदाही देशाच्या संसदेत झाला पाहिजे, तरच आपण देशाच्या संसाधनांचा योग्य वापर करू शकू. देशावर अतिरिक्त बोजा होता कामा नये.