अडवानींसह सर्व आरोपींना लेखी उत्तर देण्याचे निर्देश

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

"बाबरी' प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर

नवी दिल्ली: अयोध्यातील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 13 जणांविरुद्धची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे लांबणीवर टाकली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना लेखी उत्तर सादर करण्यास सांगितले.

न्यायाधीश पी. सी. घोष आणि न्यायाधीश आर. एफ. नरीमन यांच्या खंडपीठाने या प्रकरणात सहभागी सर्व पक्षकारांना 6 एप्रिलपर्यंत त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिलला निश्‍चित केली. सुनावणीला सुरवात होताच, भाजपच्या नेत्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील के. के. वेणुगोपाल यांनी अन्य खंडपीठासमोर हजर होण्यासाठी परवानगी मागितली. खंडपीठाने वेणुगोपाल यांची याचिका मान्य केली. मात्र, सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत सर्व पक्षकारांनी त्यांचे लेखी उत्तर सादर करावे असे स्पष्ट केले.

Web Title: Written instructions to answer all the accused and adavani