'समाजवादी' दिलजमाईः यादव पिता-पुत्र एकत्र

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

लखनौ - उत्तर प्रदेशात गेले दोन दिवस उठलेले राजकीय वादळ शमविण्यात समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांना आज (शनिवार) सकाळपासून यश आले. 

पिता-पुत्रांमध्ये झालेल्या दिलजमाईनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सरचिटणीस रामगोपाल यादव यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचे निलंबन मागे घेतल्याची माहिती दिली. 

सकाळी अखिलेश यादव यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन आमदारांचा पाठिंबा आपल्यालाच असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ते आझम खान यांच्यासोबत मुलायमसिंह यांना भेटण्यासाठी गेले. त्यावेशी शिवपाल यादवही उपस्थित होते. या भेटीनंतर निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. अखिलेश यादव यांनी अमरसिंह यांची हकालपट्टी करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्‍यता असताना, सत्ताधारी समाजवादी पक्षात फूट पडण्याची शक्यता होती. मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यादव व रामगोपाल यादव यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. 

मुलायमसिंह यादव यांनी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर, अखिलेश यांनी उमेदवारांची स्वतंत्र 235 नावांची यादी जाहीर केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिली. मुलायमसिंह यांनी शनिवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री गटाचे असलेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी रविवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्याचे उत्तर देताना मुलायमसिंह यादव यांनी दोघांनाही पक्षातून काढून टाकले होते.

तत्पूर्वी, आज सकाळीच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज (शनिवार) मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधला. यादव पिता-पुत्रांमधील वाद मिटविण्यासाठी लालूप्रसाद यांनी पुढाकार घेतला आणि उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी भांडण मिटविले पाहिजे, असे लालूप्रसाद यांनी सांगितले. 

Web Title: Yadav family units; Akhilesh is back to Samajwadi Party