समाजवादी पक्षातील 'यादवी' संपेना

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

लखनौ - समाजवादी पक्षातील "यादवी' अजूनही मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज त्यांची "विकास रथ यात्रा' येत्या तीन नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमास त्यांना अनुपस्थित राहावे लागणार आहे.

पक्षाचे नेते व वडील मुलायमसिंह यादव यांना आज मुख्यमंत्री अखिलेश यांनी पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे, की काका शिवपाल यादव यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर गेल्या महिन्यात थांबविलेली विकास रथ यात्रा पुढे सुरू करण्याची माझी इच्छा आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी आधीपासूनच प्रचार सुरू केला आहे. खरे तर तीन ऑक्‍टोबरपासूनच ही यात्रा सुरू करण्याचा माझा विचार होता. मात्र, काही कारणांमुळे ती रद्द केली. आता तीन नोव्हेंबरपासून मी ही यात्रा पुन्हा सुरू करणार आहे.''

या घोषणेमुळे अखिलेश यादव पक्षाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला अनुपस्थित राहतील, अशी चर्चा पक्षात सुरू झाली आहे. पाच नोव्हेंबरपासून हा सोहळा सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या युवा नेत्यांवर कारवाईचा इशारा पक्षाने दिला आहे. त्यावरील नाराजी व्यक्त करण्यासाठी अखिलेश यादव यांनी हे पाउल टाकल्याची चर्चा आहे.

Web Title: yadavi in samajwadi party