यमुना नदीने ओलांडली धोक्‍याची पातळी 

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

मुसळधार पावसामुळे यमुना नदीने आपली धोक्‍याची पातळी ओलांडली असून, तिच्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे यमुना नदीने आपली धोक्‍याची पातळी ओलांडली असून, तिच्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

हाथीकुंड धरणातील 90 हजार क्‍युसेस असलेली धोक्‍याची पातळी ओलांडून सकाळी नऊ वाजता दोन लाख 11 हजार क्‍युसेक्‍स इतक्‍या पातळीवर पोचली आहे. आज रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान यमुनेचे पाणी दिल्ली रेल्वे पुलापर्यंत 205.40 मीटर उंचीपर्यंत पोचण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती पूर्व दिल्ली जिल्हा प्रशासनाने आपल्या पत्रकात दिली आहे. आज सकाळी सातपर्यंत यमुनेचे पाणी जुन्या रेल्वे पुलाच्या 204.92 मीटर उंचीपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Yamuna river crossing danger level