ऐतिहासिक टप्प्यानिमित्त 'आकाशवाणी'चे वर्षभर कार्यक्रम 

ऐतिहासिक टप्प्यानिमित्त 'आकाशवाणी'चे वर्षभर कार्यक्रम 

नवी दिल्ली : दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीचा प्रचार रोखण्यासाठी भारतातील ब्रिटिश सरकारने एक ऑक्‍टोबर 1939 ला प्रथमच ऑल इंडिया रेडिओद्वारे देशाबाहेर प्रक्षेपण केले. या ऐतिहासिक घटनेला पुढील वर्षी 80 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त उद्यापासून (ता. 1) पुढील वर्षी एक ऑक्‍टोबरपर्यंत एक वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ऑल इंडिया रेडिओने (आकाशवाणी) ठरविले आहे. 

ब्रिटिशांच्या सोयीसाठी आकाशवाणीचे विदेशातील प्रक्षेपण सुरू झाले असले तरी आता जागतिक पातळीवर तो भारताचा आवाज बनला आहे. एक ऑक्‍टोबरला "बाह्य प्रक्षेपण दिन' साजरा करण्याचा निर्णय गेल्या वर्षीच झाला असून त्यानुसार उद्या (ता. 1) विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्ये हा दिन साजरा केला जाणार आहे, अशी माहिती आकाशवाणीच्या बाह्य सेवा विभागाचे प्रमुख अमलनज्योती मुजुमदार यांनी दिली.

पुढील वर्षी एक ऑक्‍टोबरला बाह्य प्रक्षेपणाला 80 वर्षे पूर्ण होत असल्याने उद्यापासूनच वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. काही निवडक देशांमध्येही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रयत्न असल्याचे मुजुमदार यांनी सांगितले. 

"आकाशवाणी'च्या बाह्य सेवेचा विस्तार 

- 150 : देशांमध्ये प्रक्षेपण 
- 28 : भाषांमध्ये बातम्या आणि इतर कार्यक्रम 
- परकी भाषा सेवांमध्ये अरेबिक, बलुचि, ब्राह्मी, चिनी, दारी, फ्रेंच, इंडोनेशियन, पर्शियन या भाषांचाही समावेश 
- जपान आणि भूतानमधील भाषांमध्येही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com