येडियुरप्पा यांनी गडकरींसह अनेकांना दिली कोट्यवधींची लाच!

येडियुरप्पा यांनी गडकरींसह अनेकांना दिली कोट्यवधींची लाच!

नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपच्या नेत्यांना हजारो कोटी रुपयांची लाच दिली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) केला. याबाबत त्यांनी पुरावे म्हणून एक डायरीही त्यांनी सादर केली आहे. यामध्ये पक्षाला तब्बल एक हजार कोटी रुपये तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि नितीन गडकरी यांना प्रत्येकी 150 कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून आज पत्रकार परिषद घेतली जाणार होती. मात्र, आज होणारी पत्रकार परिषद दोनदा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर अखेर रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये येडियुरप्पा भाजपच्या नेत्यांना 1800 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला. याचा तपशीलही त्यांनी यावेळी सादर केला.

यामध्ये त्यांनी या 1800 कोटी रुपयांच्या लाचेपैकी एक हजार कोटी भाजपला, जेटली आणि गडकरी यांना प्रत्येकी 150 कोटी देण्यात आले होते. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना 100 कोटी दिल्याचे सांगितले. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रत्येकी 50 कोटी रुपये दिले गेले. 

याशिवाय न्यायाधीशांना तब्बल 250 कोटी, वकिलांना 50 कोटी दिले गेले. तर नितीन गडकरी यांच्या मुलाच्या लग्नासाठी 10 कोटी दिल्याचा आरोप यावेळी सुरजेवाला यांनी केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com