चाचणीपूर्वीच येडियुरप्पा राजीनामा देण्याची दाट शक्‍यता

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सुरू झालेल्या राजकीय नाट्याला आज (शनिवार) दुपारनंतर आणखी एक वळण मिळण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. ज्या खुर्चीसाठी सर्व आटापिटा चालू आहे, त्याच पदाचा राजीनामा देऊन भाजपचे येडियुरप्पा आणखी एक चाल खेळतील, असे मानले जात आहे. 

कर्नाटक विधानसभेत भाजप सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. भाजपकडे अजूनही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी येडियुरप्पा भाषण करतील आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भाषणानंतर लगेचच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ घेतली आहे. त्यामुळे हा अंदाज वर्तविला जात आहे. 

बहुमत चाचणीला सामोरे जाऊन पराभव स्वीकारण्याऐवजी त्यापूर्वीच राजीनामा देण्याचा विचार पक्षामध्ये सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. यापूर्वी येडियुरप्पा 13 पानी भावूक भाषण करतील, असेही सूत्रांकडून समजले असल्याचे 'सीएनएन-न्यूज 18'ने म्हटले आहे. 

बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी भाजपने विविध मार्गांचा वापर करून बहुमत मिळविण्याचे प्रयत्न केल्याचे आरोप कॉंग्रेस आणि 'जेडीएस'ने केले आहेत.

Web Title: Yeddyurappa likely to resign before Karnataka Trust Vote