राजीनाम्यापूर्वी येडियुरप्पांचे 'वाजपेयी स्टाईल' भाषण!

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

बंगळूर : 'आम्हाला जनतेने 104 जागा दिल्या. 113 जागा मिळाल्या असत्या, तर आम्ही हे राज्य सुजलाम सुफलाम केले असते', अशा शब्दांत भावना व्यक्त करून भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी विधानसभेत भावूक भाषण केले. 

कर्नाटकमध्ये बहुमत चाचणीला सामोरे जाव्या लागलेल्या येडियुरप्पा यांच्या पक्षाकडे बहुमतासाठी आवश्‍यक ते संख्याबळ नव्हते. त्यामुळे अखेरपर्यंत ही जमवाजमव करण्याचे प्रयत्न सुरू होते. संख्याबळ नसल्याने येडियुरप्पा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे, असे वृत्त दुपारी दोनच्या सुमारास पसरले. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी येडियुरप्पा भाषण करतील, असेही सांगितले जात होते. 

दुपारी साडेतीननंतर विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यावेळी उर्वरित आमदारांचा शपथविधी झाला. त्यानंतर येडियुरप्पा भाषणासाठी उभे राहिले. 

जवळपास अर्धा तास केलेल्या भाषणामध्ये येडियुरप्पा म्हणाले, "हे जनमत कॉंग्रेस किंवा धर्मनिरपेक्ष जनता दलासाठी नव्हते. कर्नाटकच्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यांना नाही! गेल्या दोन वर्षांपासून मी राज्यभरात दौरे केले. जनतेची दु:खं मी जवळून पाहिली आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना मी पाहिल्या आहेत. त्यांच्यासाठी काम करण्याची माझी इच्छा होती. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदी माझी निवड केली. कर्नाटकच्या जनतेने मला दिलेले प्रेम कधीच विसरणार नाही.'' 

Web Title: Yeddyurappa resigns after emotional speech