कर्नाटकात पुन्हा कमळ फुलणार; येडियुरप्पांचा आज शपथविधी

Yeddyurappa will take oath as CM of Karnataka today evening
Yeddyurappa will take oath as CM of Karnataka today evening

बंगळूर : कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या पराभवाच्या नाट्यानंतर आता भाजपने सरकार स्थापनेसाठी वेगवान पाऊले उचलली आहे. आता भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.एस येडियुरप्पा हे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. या भेटीमध्ये त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आज संध्याकाळी सहा वाजता येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रिपदाची शपथ होईल.

राज्यपालांची भेट घेत येडियुरप्पा यांनी त्यांना 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोपवले आणि सत्तास्थापनेचा दावा केला. येडियुरप्पा हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे त्यांच्या नावाची अधिकृ घोषणा करतील आणि त्यानंतर आज संध्याकाळी त्यांचा शपथविधी होईल. 

कर्नाटक मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह केवळ 34 मंत्र्यांचा समावेश होऊ शकणार आहे. मात्र, भाजप आमदारांपैकी 56 ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहे. तसेच बंडखोर आमदारांपैकीही काहींना आमदरापद द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता येडियुरप्पांची डोकेदुखी वाढणार आहे हे  निश्चित आहे.

दरम्यान कुमारस्वामी यांच्या सरकारविरुद्ध एकूण 17 आमदरांनी बंड केले होते आणि त्यांनी आपले राजीनामे रमेश कुमार यांच्याकडे सोपविल्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळले.  

दरम्यान, कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्यास भाजप नेते येदियुरप्पा यांना त्यासाठी कसरत करावी लागणार आहेत. भाजप आमदारांपैकी ५६ ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहे. त्याशिवाय १५ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना महत्त्वाची पदे द्यावी लागतील.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com