येडियुरप्पा सरकार टिकणार की जाणार ?, १५ जागांवर मतदान सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

कर्नाटकमध्ये गुरुवारी सकाळपासून विधानसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये गुरुवारी सकाळपासून विधानसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दरम्यान, १७ पैकी १३ जणांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकिट मिळवलंय. आजच्या निवडणुकीत ९ महिलांसह एकूण १६५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसनं सर्व १५ जागांवर तर जेडीएसनं १२ जागांवर उमेदवार उभे केलेत. ९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

त्यावेळी येडियुरप्पा सरकार टिकतं की जातं, भाजप बहुमतापासून दूर राहिल्यास कोणतं नवं राजकीय समीकरण अस्तित्त्वात येतं, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. शिवाय महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बंडखोरांना जनतेनं नाकारलं असताना आता कर्नाटकची जनता कुणाला कौल देते याचीही उत्कंठा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yediyurappa govt karnataka bypolls voting begins for 15 karnataka assembly constituencies