येडियुरप्पा एक दिवसाचे मुख्यमंत्री : सूरजेवाला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

''येडियुरप्पा यांच्याकडे फक्त 104 आमदारच असून, त्यांना इतर कोणत्याही आमदाराचा पाठिंबा नाही. उलट आमच्याकडे 116 आमदार आहेत. उद्या बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यावेळी आम्हीच जिंकू, त्यामुळे येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागेल''.

- रणदिप सूरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

नवी दिल्ली : ''कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावावर इतिहासात एक नोंद होणार आहे. ते केवळ एक दिवसाचे मुख्यमंत्री असतील. उद्या जेडीएस आणि काँग्रेसने बहुमत सिद्ध केल्यास त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल'', अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप किंवा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात असताना येडियुरप्पा यांनी काल (गुरुवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर टीका केली जात आहे.

yeddyurappa

याबाबत सूरजेवाला म्हणाले, की ''येडियुरप्पा यांच्याकडे फक्त 104 आमदारच असून, त्यांना इतर कोणत्याही आमदाराचा पाठिंबा नाही. उलट आमच्याकडे 116 आमदार आहेत. उद्या बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यावेळी आम्हीच जिंकू, त्यामुळे येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागेल'', असेही ते म्हणाले. 

Web Title: yediyurappa one day Chief Minister says Congress Randip Surjewala