होय, नेटवर्क नसतानाही तुम्ही आता कॉल करू शकणार?

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नेटवर्क नसताना फोन कॉल करताना आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. अगदी कित्येक किलोमीटरची पायपीट ते उंच ठिकाणावरून चढून बसण्यापासून ते चालू गाडीतून डोके बाहेर काढण्यापर्यंत कितीतरी पर्याय वापरले जातात. पण, नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकलात तर? होय हे शक्य आहे. आणि ही किमया साधणार आहे रिलायन्स जिओ. 

मुंबई- नेटवर्क नसताना फोन कॉल करताना आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. अगदी कित्येक किलोमीटरची पायपीट ते उंच ठिकाणावरून चढून बसण्यापासून ते चालू गाडीतून डोके बाहेर काढण्यापर्यंत कितीतरी पर्याय वापरले जातात. पण, नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकलात तर? होय हे शक्य आहे. आणि ही किमया साधणार आहे रिलायन्स जिओ. 

स्वस्त दरात इंटरनेट आणि कॉलिंग उपलब्ध करून दिल्यानंतर रिलायन्स जिओ सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. आता रिलायन्स जिओ आणखी एक क्रांतिकारी सेवा आणण्याच्या तयारीत आहे. मोबाईल नेटवर्क नसेल तरीही कॉल करता येईल अशी ती सुविधा असेल. VoWi-Fi असे या सुविधेचे नाव असून कंपनीकडून त्याची चाचणी सुरु आहे. नुकतीच मध्य प्रदेशमध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून लवकरच देशात ही सुविधा प्रत्यक्ष वापरात आणण्यात येईल असे कंपनीच्या एका अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिओच्या या सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही एखाद्या ठिकाणी नेटवर्कमध्ये नसाल तरीही तुम्हाला फोन करता येणार आहे. आपातकालिन स्थितीत या सुविधेचा विशेष उपयोग होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा केवळ जिओ वरुन जिओवर कॉल करण्यासाठी उपलब्ध असेल. नंतर त्याचा विस्तार करण्यात येणार असून जिओवरुन इतर नेटवर्कवरही ती वापरता येईल. ग्रामीण भागात अनेकदा नेटवर्कची अडचण असते. यामध्ये वायफायद्वारे कॉलिंग करता येणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा विशेष फायदा होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. दूरसंचार विभागाने या अनोख्या फिचरला परवानगी दिल्यानंतरच ही सुविधा प्रत्यक्ष वापरासाठी आणण्याचे नक्की झाले. काही देशांमध्ये वोडाफोनने ही सुविधा सुरु केली आहे, मात्र भारतातील हा रिलायन्सच्या माध्यमातून होणारा हा पहिलाच प्रयोग आहे.

Web Title: Yes can you be able to call now when there is no network