रामदेवबाबांनी घेतली लालूप्रसाद यांची भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पाटना -  गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची योगगुरू रामदेवबाबा यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या वेळी रामदेवबाबा यांनी लालूप्रसाद यांना तंदुरुस्तीच्या टिप्सही दिल्या.
नोटाबंदीच्या विरोधी आंदोलन करण्यासाठी आलेल्या ममता बॅनर्जी यांनीही लालूप्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. लालूप्रसाद आमचे वरिष्ठ नेते असल्यामुळे पाटन्यात येऊन त्यांची भेट घेणार नाही असे कधी होणार नाही, असे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले होते.

योगगुरू रामदेवबाबा यांनी आज लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. ते म्हणाले, की लालूप्रसाद यादव हे आमचे सामाजिक आणि राजकीय महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती ठणठणीत असणे महत्त्वाचे आहे. रामदेवबाबा यांच्या पुतणीचे लग्न लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप याच्याबरोबर करण्याबाबत चर्चा चालू आहे, अशी माहिती मिळत आहे; मात्र याबाबत अद्याप दोघांनीही कोणतीही औपचारिक
घोषणा केलेली नाही. वास्तविक, केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयावर लालूप्रसाद यादव यांनी टीका केली आहे, तर रामदेवबाबा यांनी समर्थन केले असून, भविष्याच्या दृष्टीने चांगला निर्णय असल्याचे म्हटले आहे.

Web Title: yoga guru baba ramdev meets lalu prasad yadav in patna