'यूपी'त चाळीस जिल्ह्यांत योग आरोग्य केंद्र

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

लखनौ: उत्तर प्रदेशच्या चाळीस जिल्ह्यांत चालू आर्थिक वर्षात योग आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाच्या सादरीकरणादरम्यान शुक्रवारी रात्री राज्यातील उर्वरित 35 जिल्ह्यांत योग आरोग्य केंद्राची स्थापना केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार असल्याचे नमूद केले.

येत्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर लखनौमध्ये 51 हजार सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचीही माहिती आदित्यनाथ यांनी दिली. यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. आयुर्वेद, युनानी, पंचकर्म आणि क्षारसूत्र विशेष विभाग केंद्राची स्थापना लखनौ, गोरखपूर, वाराणसी, सहारनपूर तसेच बांदा येथे केली जाणार आहे. वाराणसीतील राजकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, यूनानी कॉलेज, अलाहाबाद आणि टीटी कॉलेज लखनौ, राजकीय होमिओपॅथी मेडिकल कॉलेज- लखनौ, अलाहाबाद येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

Web Title: Up: Yoga Health Center 40 in districts