'योग' आयुष्याला समृद्ध करतो! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

'योग लोकांना जोडण्याचे काम करतो. आज भारतीयांसाठी अभिमानाचा व गर्वाचा क्षण असून जिथे ज्या वेळी सुर्योदय होईल तिथे लोक योग करून सुर्याचे स्वागत करतीलस,' असे मत मोदींनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : आज (ता. 21) चौथ्या जागतिक योगदिनी भारतासह जगभरातील लोक पहाटेपासूनच योगांची प्रात्यक्षिके करत योगदिन साजरा करत आहेत. या योगदिनाचा सगळीकडे उत्साह दिसत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही डेहराडूनच्या एका कार्यक्रमात सूर्यनमस्कार व योग करत योगदिन साजरा केला. 

'योग लोकांना जोडण्याचे काम करतो. आज भारतीयांसाठी अभिमानाचा व गर्वाचा क्षण असून जिथे ज्या वेळी सुर्योदय होईल तिथे लोक योग करून सुर्याचे स्वागत करतीलस,' असे मत मोदींनी व्यक्त केले.

योग आयुष्याला समृद्ध करतो, मानसिक तणाव दूर करायला मदत करतो, भेदभाव होणाऱ्या गोष्टी जेव्हा वरचढ ठरतात, त्यावेळी सामाजात तणाव पसरतो, सर्व ठिकाणी फूट पडू लागते, अशा वेळी योग अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे समाजात सद्भभावना निर्माण होते. असेही त्यांनी सांगितले. जगभरात पहिल्यांदाच सर्वाधिक देशांनी योगदिनाच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला, असेही त्यांनी बोलताना सांगितले.    

पंतप्रधान नरेंद्र मोदी डेहराडूनच्या वन संशोधन संस्थेत होणाऱ्या योगदिनाच्या कार्यकेरमात सहभागी होते. या कार्यक्रमात 50 हजार लोक सहभागी होते. जगभरातील 150 देशांमध्ये हा योगदिन साजरा केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 21 जून 2014 मध्येच आंतरराष्ट्रीय योगदिन जाहीर केला होता व भारताची मागणी मान्य केली होती.

Web Title: yoga helps to connect the people said narendra modi on world yoga day