पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींसह दिग्गज नेते करणार योगासने 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

नेहमीप्रमाणे यंदाही चौथा जागतिक योग दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून "योगा पॉर पीस अँड हार्मनी' ही यंदाच्या योग दिनाची थीम असेल.

नवी दिल्ली : नेहमीप्रमाणे यंदाही चौथा जागतिक योग दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून "योगा पॉर पीस अँड हार्मनी' ही यंदाच्या योग दिनाची थीम असेल.

जगभर योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विशेष आग्रही असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डेहराडूनमधील योग दिनाच्या उत्सवात सहभागी होणार असून सध्या सुरीनामच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे तेथील योग शिबिरामध्ये सहभागी होतील. युरोपच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या ब्रुसेल्समधील युरोपियन संसदेमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.

डेहराडूनमधील वन संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात मोदी सहभागी होणार असून येथे ते हजारो स्वयंसेवकांसोबत योगासनेही करतील. लखनौमध्ये योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथसिंह सहभागी होणार असून, मुंबईतील कार्यक्रमाला उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू हजेरी लावणार आहेत. सर्वोच्च युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात दोनशे सैनिकही योग शिबिरांत सहभाग घेतील. 

Web Title: Yoga will become a with big leader, Prime Minister Modi and President t