योगींच्या निशाण्यावर अखिलेश यादव; म्हणाले, तो इतिहास आहे...

योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला
Yogi Adityanath,Akhilesh Yadav
Yogi Adityanath,Akhilesh YadavEsakal

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांसाठी कसरतीची ठरत आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी धर्माच्या मुद्यावर नेहमीच राजकारण केलं जातं. मथुरेतील मंदिराचा मुद्दा, हिंदू-मुस्लिम प्रश्न समोर घेऊन टीका- टिप्पणी सुरुच असते. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सैफई महोत्सव आणि दीपोत्सवाची तुलना करत अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राज्याची ओळख आता 'दिव्य कुंभ' आणि 'भव्य दीपोत्सव'ने झाली आहे, ती तशीच राहील अशी खिल्ली उडवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर ट्विट करत टीकेचे झोड उठवले आहे.

Yogi Adityanath,Akhilesh Yadav
देशभक्तीची भावना जागृतीसाठी केजरीवालांनी दिल्लीत 75 ठिकाणी फडकवला तिरंगा

प्रदेश की पहचान अब 'दिव्य कुंभ' और 'भव्य दीपोत्सव' से है, वही रहेगी.प्रदेश की पहचान 'सैफई महोत्सव' से बनाने की लालसा रखने वाले अब इतिहास हैं, इतिहास ही रहेंगे,असा घणाघात केला आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्यात एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत आहेत. विरोधकांना गोत्यात आणण्याची एकही संधी सोडत नाहीत असे चित्र पहावयास मिळत आहे .

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक ट्विट केले आहे त्यात ते म्हणतात, आप सब साक्षी हैं...वे अंधेरा लाए थे, हम उजाला लाए।वे गुंडाराज लाए थे, हम कानून का राज लाए।वे अवैध तमंचों की फैक्ट्री लगवाते थे, हम डिफेंस कॉरिडोर लाए। वो हज हाउस लाए थे, हम रामलला का मंदिर लाए हैं।अशा पद्धतीने त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकेची झोड उठवीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com