योगी सरकारने केली मदरशांची कोंडी; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

योगींच्या मंत्रिमंडळात या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. या मदरशांना आता कोर्टात जाऊनही दिलासा मिळणार नाही.
Adityanath Yogi
Adityanath YogieSakal

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरशांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता मदरशांची चांगलीच कोंडी होणार आहे. योगी सरकारने नव्या मदरशांना अनुदान मिळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. योगी सरकारच्या मागच्या काळातही मदरशांना अनुदान दिलेलं नव्हतं. (UttarPradesh chief Minister Yogi Adityanath)

योगींच्या मंत्रिमंडळात या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. या मदरशांना आता कोर्टात जाऊनही दिलासा मिळणार नाही. तो मार्गही योगी सरकारने बंद केला आहे. मागच्या अखिलेश सरकारचं यासंदर्भातलं धोरणं योगी सरकारने बंद केलं आहे. सध्या उत्तर प्रदेशात ५५८ मदरशांना सरकारी अनुदान दिलं जात आहे.

Adityanath Yogi
यूपीत मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; योगी सरकारचा मोठा निर्णय

योगी सरकारने तपास केला असता, अनेक मदरसे दर्जा पूर्ण करत नाहीत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं योगी सरकारचं म्हणणं आहे. गेल्या महिन्यात योगी सरकारने आधुनिक मदरसा योजनेंतर्गत राज्यातल्या मदरशांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, जुन्या मदरशांचं अनुदान मात्र कायम राहणार आहे. नव्या मदरशांना अनुदान यादीतून वगळण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com