भटक्‍या गायींसाठी निवारे उभारा; उत्तर प्रदेशमध्ये आदेश

वृत्तसंस्था
बुधवार, 26 डिसेंबर 2018

लखनौ : केंद्रीय आणि राज्य पातळीवर भाजपचे राजकारण गाय आणि राममंदिर या दोन घटकांभोवती घुटमळत असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता भटक्‍या गायींसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.

गायरान जमिनींवरील अतिक्रमणेदेखील तातडीने हटविण्यात यावीत, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आदेश दिले. या बैठकीस मुख्य सचिव अनुप चंदा देखील उपस्थित होते. आदित्यनाथ यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिफारशी देखील मागविल्या आहेत. 

गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत ती अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत. ग्रामीण आणि नागरी भागांमध्ये गायींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवारागृहांमध्ये योग्य चारा आणि पेयजलाची व्यवस्था उभारण्यात यावी तसेच जिल्हा आणि पंचायत पातळीवर तातडीने साडेसातशे निवारागृहे कार्यान्वित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. 

राज्य सरकारकडून निधी 
राज्य सरकारने सोळा महापालिकांना गायींसाठी निवारा उभारण्यासाठी प्रत्येकी दहा कोटी रूपयांची रक्कम देऊ केली आहे. यातील एक कोटी 20 लाख रूपयांची रक्कमही जिल्हापातळीवर गोशाळेच्या उभारणीसाठी देण्यात आली आहे. यातील बराचसा निधी याआधीच मंजूर करण्यात आला असून उर्वरित निधीही लवकरच दिला जाणार आहे असेही आदित्यनाथ यांनी सांगितले. विशेष राज्य सरकारच्या एवढ्या प्रयत्नानंतर केवळ बरेली आणि लखनौ पालिकांनीच गोशाळांची कामे पूर्ण केली आहेत.

Web Title: Yogi Adityanath government focuses more on cows