'तबलिगीं'नीच कोरोना पसरवला; योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य

वृत्तसंस्था
शनिवार, 2 मे 2020

तबलिगींचे कृत्य चुकीचे

लखनौ : 'तबलिगी जमात'च्या लोकांनी कोरोनाची लागण झाल्याचे लपविले होते. त्यांचे हे कृत्य अक्षम्य अपराध आहे. त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे लपविले नसते, तर आज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी असती, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. तसेच तबलिगींविरोधात कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातचा कार्यक्रम पार पडला होता. यामध्ये हजारो जण उपस्थित होते. उपस्थितांपैकी काहींना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार करण्यामागे तबलिगी जमातच्या लोकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

त्यानंतर आता यावर योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, तबलिगींनी कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे लपविले. त्यांनी कोरोना व्हायरस विविध ठिकाणी पसरवला. त्यांचे हे कृत्य चुकीचे आहे. आज राज्यात जवळपास 1600 कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आहेत. यातील एक हजारपेक्षा जास्त तबलिगींशी संबंधित आहेत. 

The Tablighi Jamaat

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तबलिगींचे कृत्य चुकीचे

तबलिगी जमातच्या लोकांनी ज्याप्रकारे हे कृत्य केले ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी वेळीच प्रशासनाला माहिती द्यायला हवी होती. मात्र, त्यांनी कोरोनाची माहिती लपविली. त्यानंतर अनेकांना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यांचे हे कृत्य म्हणजे जाणूनबुजून केलेला अपराध आहे. 

CM Yogi adityanath

...तर परिस्थिती बिघडली नसती

उत्तर प्रदेशात 3 हजारांपेक्षा जास्त तबलिगींनी विविध ठिकाणी हा अपराध केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन केले. तबलिगींना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी तिथेही कोरोना पसरवला. त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला योग्यवेळी प्रतिसाद दिला असता, तर परिस्थिती बिघडली नसती, असेही आदित्यनाथ म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogi Adityanath Hit Tablighi Jamaat For Spreading Coronavirus Says we Will Take Action Against Them