मुस्लिम मुलींच्या सामुदायिक विवाहाचे यूपीत आयोजन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

राज्यातील जनसंख्येच्या 20 टक्के मुस्लिम समाजाची जनसंख्या आहे. या प्रकारचा प्रस्ताव तयार केला आहे. या सामुदायिक विवाहात प्रत्येक नववधूला 20 हजार रुपये दिले जाणार आहेत.

लखनौ - उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मुस्लिम समाजातील गरीब मुलींच्या सामुदायिक विवाहांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे.

या आयोजनाद्वारे आपली कट्टर हिंदू प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम समाजातील गरीब मुलींच्या सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यास परवानगी दिली असून, राज्य सरकारने आपल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात त्याचा सहभाग केला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मोहसिन रझा यांनी आज येथे दिली. 

राज्यातील जनसंख्येच्या 20 टक्के मुस्लिम समाजाची जनसंख्या आहे. या प्रकारचा प्रस्ताव तयार केला आहे. या सामुदायिक विवाहात प्रत्येक नववधूला 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याशिवाय राज्य सरकार सामूहिक विवाहाचा खर्च उचलणार आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना रझा म्हणाले, की केंद्र सरकारच्या सहायाने ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सद्‌भावना मंडप उभारण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात या प्रकारे शंभर विवाहांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

Web Title: Yogi Adityanath to hold mass weddings for poor Muslims under government's Sadbhavna Mandap