होळीनिमित्त राज्यात कायदा सुव्यवस्था राखावी

पीटीआय
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यंदाच्या वर्षी होळीचा सण हा शुक्रवारी असून, त्या दिवशी मुस्लीमधर्मीय नमाजपठण करीत असतात. त्यामुळे सर्व जणांनी कायदा- सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

लखनौ - होळीच्या वेळी विविध समुदायांमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. राज्य सरकारवर कोणताही आरोप होऊ नये यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

होळी शांततेत आणि सामंजस्याने होण्यासाठी विविध समुदायांशी बोलणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकारच्या कारभारावर कोणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार नाही, या पद्धतीने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सरकारी प्रवक्‍त्याने सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यंदाच्या वर्षी होळीचा सण हा शुक्रवारी असून, त्या दिवशी मुस्लीमधर्मीय नमाजपठण करीत असतात. त्यामुळे सर्व जणांनी कायदा- सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: yogi adityanath holi festival uttar pradesh