उत्तर प्रदेशात 6 नवे 'एम्स' सुरु करणार- योगी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

डॉक्टरांनी रुग्णांशी आपुलकीने बोलले तर त्यांचे अर्धे दुखणे दूर होते. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना काळजी घेतली पाहिजे. लवकरच राज्यात सहा एम्स रुग्णालये सुरु करण्यात येतील.

लखनौ - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील आरोग्यव्यवस्था सुधारणार असल्याचे सांगत सहा नवी एम्स रुग्णालये सुरु करण्याची घोषणा केली.

लखनौमधील किंग्ज जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यात डॉक्टरांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही सांगितले. उत्तर प्रदेशातील आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी किमान पाच लाख डॉक्टरांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

डॉक्टरांनी रुग्णांशी आपुलकीने बोलले तर त्यांचे अर्धे दुखणे दूर होते. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना काळजी घेतली पाहिजे. लवकरच राज्यात सहा एम्स रुग्णालये सुरु करण्यात येतील. याबरोबरच दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरु होतील. राज्यातील नागरिकांची जबाबदारी डॉक्टरांवर आहे, असे आदित्यनाथ म्हणाले.

Web Title: Yogi Adityanath promises to revamp UP's healthcare system, says govt will open six new Aiims