उत्तर प्रदेशची स्थिती काश्‍मीरसारखी - योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मी कोणत्या विशिष्ट धर्म किंवा जातीचा उल्लेख केला नसून आम्ही जाती-पातीवर आधारित राजकारण करीत नाही. ना अशा मुद्द्यांवर समाजात फूट पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

गाझियाबाद - उत्तर प्रदेशचा पश्‍चिमेकडील भाग व काश्‍मीरमध्ये 1990 मध्ये उद्भवलेली स्थिती ही एकसारखी असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. काश्‍मिरी पंडितांना ज्या पद्धतीने काश्‍मीर सोडने भाग पडले तसाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आदित्यनाथ म्हणाले, ''कैराणासह लगतच्या जिल्ह्यांत अराजकतेचे वातावरण असून येथील हिंदू कुटुंबे स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील गुन्ह्यांत मोठी वाढ झाली असून सर्वत्र गुंडगिरी माफियाचे साम्राज्य पसरले आहे.'' राज्याची सुरक्षा पणाला लावत राज्य सरकार कधीपर्यंत मताचे राजकारण करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजप सत्तेत आल्यास हे स्थलांतर पूर्णपणे थांबेल. या स्थलांतरास तेथील जिल्हाधिकारीही तितक्‍या प्रमाणात कारणीभूत असून यासाठी विशेष कृती दल तैनात करणार असल्याचेही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानाची पाठराखण केली. येथील सद्यस्थिती चिंताजनक असून हिंदू कुटुंबीयांच्या स्थलांतरास कारणीभूत असलेल्यांना समाजवादी पक्ष पाठिशी घालत असल्याचा आरोप, भाजपचे राज्यप्रमुख केशव प्रसाद मौर्य यांनी केला आहे.
 

Web Title: yogi adityanath slams situation in up