धार्मिक स्थळांजवळील मद्याच्या दुकानांवर कारवाई करावी

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याच्या दिलेल्या सूचनांनंतर राज्यातील आठ हजार 544 मद्य दुकाने शाळा, धार्मिक स्थळे, कामाची ठिकाणे, रुग्णालये आणि प्रसिद्ध भाग यांच्यापासून काही अंतरावर सुरू करण्यास परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले

लखनौ - अयोध्या, चित्रकूट, वृंदावन आणि देव शरीफ यांसारख्या धार्मिक स्थळांजवळील मद्याच्या दुकानांवर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील उत्पादनशुल्क विभागातील अधिकाऱ्यांना केली आहे. उत्पादनशुल्क विभागाच्या बैठकीत ते म्हणाले की, राज्यातील महसूल वाढविण्यासाठी उत्पादनशुल्क विभागाने नवीन धोरण अवलंबिवावे.

राज्यातील धार्मिक स्थळांजवळील मद्य दुकानांवर कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. काल रात्री घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात हा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याच्या दिलेल्या सूचनांनंतर राज्यातील आठ हजार 544 मद्य दुकाने शाळा, धार्मिक स्थळे, कामाची ठिकाणे, रुग्णालये आणि प्रसिद्ध भाग यांच्यापासून काही अंतरावर सुरू करण्यास परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले.

वाराणसीमधील काशी विश्‍वनाथ मंदिरापासून, मथुराच्या कृष्ण जन्मस्थान आणि अलाहाबाद संगमापासून एक किलोमीटर अंतराच्या आत मद्य दुकाने सुरू करण्यास बंदी करावी, असे ते म्हणाले.

Web Title: Yogi Adityanath takes a new initiative