योगींच्या मंत्र्याने नाकारले दलित व्यक्तीच्या घरचे जेवण

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

योगी सरकारचे मंत्री सुरेश राणा मंगळवारी एका दलित व्यक्तीच्या घरी भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी हॅाटेलमधून जेवण मागवले यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आपण दलितांसोबत आहोत ही प्रतिमा बनवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असला तरी, हा डाव मात्र त्यांच्यावरच उलटला आहे.

नवी दिल्ली - दलित मुद्यांवर अडकलेले भाजप सरकार सध्या आपली प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तरप्रदेश सरकारचे अनेक मंत्री अशावेळी दलितांच्या घरी जाऊन जेवण करत आहेत. मुख्यंत्री योगी अदित्यनाथ यांनीसुद्धा मागे असे केले आहे. परंतु, याबाबतीच आता एक नवा वाद निर्माण झाला आहे.

योगी सरकारचे मंत्री सुरेश राणा मंगळवारी एका दलित व्यक्तीच्या घरी भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी हॅाटेलमधून जेवण मागवले यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आपण दलितांसोबत आहोत, ही प्रतिमा बनवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असला तरी, हा डाव मात्र त्यांच्यावरच उलटला आहे.

भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या नेत्यांनी दलित नेत्यांच्या घरी रात्र काढून त्यांच्यासोबत प्रेमसंबध निर्माण करावेत असे प्रयत्न असले तरी, सुरेश राणा हे त्या दलित व्यक्तीच्या घरी न थांबता एका सार्वजनिक ठिकाणी थांबले, त्याठिकाणी त्यांची व्यवस्थित सोय करण्यात आली होती.

मुख्यमंत्री योगीही यापूर्वी दलित व्यक्तीच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यांनी दलित व्यक्तीने बनवलेले जेवण न करता त्यांच्याच जातीच्या स्वाती ठाकूर यांनी बनवलेले जेवण केले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

Web Title: yogi governments minister rejected dalit person dinner