योगी सरकार म्हणजे "कैंची वाली सरकार' : अखिलेश यादव 

पीटीआय
मंगळवार, 10 जुलै 2018

ही कैंचीवाली सरकार ही एकतर समाजातील सामाजिक सौहार्दतेला कात्री लावत आहे, नाही तर केवळ आमच्या कामांच्या उद्‌घाटनाचे फित कापत आहे. - अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 

लखनौ : नोएडात जगातील सर्वांत मोठ्या मोबाईलनिर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्‌विटरवर टीका करत या प्रकल्पाची मुहूर्तमेढ समाजवादी पक्षाच्या सरकारने रोवली होती, असे म्हटले आहे. विकासाभिमुख सरकारने 2016 रोजी संबंधित मोबाईल कंपनीला प्रत्येक प्रकारच्या परवानग्या दिल्या होती. सध्याचे योगी आदित्यनाथ सरकार हे "कैंची वाली सरकार' असून, ते सामाजिक बंधुतेला "कात्री' लावत असल्याचा आरोप केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन हे नोएडा दौऱ्यावर असून, ते जगातील सर्वांत मोठ्या सॅमसंग मोबाईल प्रकल्पाचे उद्‌घाटन करणार आहेत. या कारखान्यात दररोज 7 लाख मोबाईल फोनची निर्मिती होणार असून, त्यानुसार दरवर्षी 12 कोटी मोबाईल फोन निर्मितीचा अंदाज आहे. नोएडाच्या सेक्‍टर 81 मध्ये 5 हजार कोटीच्या गुंतवणुकीतून सॅमसंगचा प्रकल्प साकारला आहे. 

ही कैंचीवाली सरकार ही एकतर समाजातील सामाजिक सौहार्दतेला कात्री लावत आहे, नाही तर केवळ आमच्या कामांच्या उद्‌घाटनाचे फित कापत आहे. - अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 

Web Title: Yogi Sarkar means kainchi wali sarkar says akhilesh