'राहुल गांधीचे नेतृत्व स्विकारणार का'- योगी अदित्यनाथ

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

2019 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष महाआघाडी करण्याची तयारी करत आहे. तर भाजपही 2019 मध्ये परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असताना, महाआघाडीवरील माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना राहुल गांधीचे नेतृत्व मायावती आणि अखिलेश यादव स्विकारणार का ? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.

लखनऊ- 2019 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष महाआघाडी करण्याची तयारी करत आहे. तर भाजपही 2019 मध्ये परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असताना, महाआघाडीवरील माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना राहुल गांधीचे नेतृत्व मायावती आणि अखिलेश यादव स्विकारणार का ? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.
 
त्याचबरोबर, महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याचे नाव अजून जाहीर करण्यात आलेले नाही. कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या मुद्यावर ते बोलत नाहीत. ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव हे सगळे दिग्गज नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील का ? असे प्रश्नही अदित्यानाथ यांनी उपस्थित केला. ही महाआघाडी नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली आहे. हे लोकांना माहीत आहे. महाआघाडी ही मोदींना आणि भाजपला हरवून देशाचा विकास थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे, हे जनतेने लक्षात घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

जनता 2019 मध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवेल आणि भाजप 2019 च्या लोकसभा निवडणुकांत पुर्ण बहुमत मिळवेल, असा विश्वासही त्यांनी दाखवला. त्याचबरोर, 2019 मध्ये काँग्रेसच्या पारंपारिक जागा अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागांवर भाजप विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे.

Web Title: yogi statement on loksabha election opposition alliance