#FathersDay ''तुम्ही जगातील सर्वोत्तम पप्पा'' : शाहरूखच्या मुलाचे पत्र

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

अब्रामने एका पांढऱ्या इनलाईन असलेल्या हिरव्या रंगाच्या कार्डवर हे लिहिले. त्याचे हे अनोखे गिफ्ट चांगलेच चर्चेत आले आहे. अब्रामने याबाबतचा फोटो 'द झिरो स्टार'ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई : जगभरात 'फादर्स डे' आज (रविवार) साजरा केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आपल्या पित्याला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला त्याचा मुलगा अब्रामने 'फादर्स डे'निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ''तुम्ही जगातील सर्वोत्तम पप्पा आहात'' असा संदेश लिहून कार्डच्या डाव्या कोपऱ्यात दोन पेपर हार्ट्स लावले.   

अब्रामने एका पांढऱ्या इनलाईन असलेल्या हिरव्या रंगाच्या कार्डवर हे लिहिले. त्याचे हे अनोखे गिफ्ट चांगलेच चर्चेत आले आहे. अब्रामने याबाबतचा फोटो 'द झिरो स्टार'ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर शाहरुखनेही या कार्डचा फोटो ट्विट केला. या फोटोसह त्याने आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. 

शाहरुख खान म्हणाला, की अब्रामने दिलेले हे गिफ्ट वडिलांचे जीवन सर्वोत्तम बनविण्याचे माध्यम आहे. त्याने दिलेले हे गिफ्ट वडिलांचे जीवन परिपूर्ण करत आहे. 

Web Title: You are the best Father in the world says Shahrukh Khan