You are On My Hit List Case Against BJP Leader For Threatening UP Cop
You are On My Hit List Case Against BJP Leader For Threatening UP Cop

भाजप नेता पोलिस अधिकाऱयाला म्हणाला; 'तू माझ्या हिटलिस्टवर...'

कानपूरः भारतीय जनता पक्षाचा नेत्याने एका पोलिस अधिकाऱयाला धमकी दिली. धमकी देत असताना ते कॅमेऱयामध्ये कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरेश अवस्थी असे धमकी दिलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सोमवारी (ता. 29) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना भाजप नेता आणि मतदान केंद्रावर तैनात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यात शाब्दिक चकमक उडाली. व्हिडीओत भाजप नेता पोलिस अधिकारी जनार्दन दुबे यांना म्हणाला, 'तू माझ्या हिटलिस्टमध्ये आहे, आज मतदान होऊ दे उद्या बघतो तुला' अशी धमकी सुरेश अवस्थी देत असल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. यावेळी कानपूरच्या महापौर प्रमिला पांडेय यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. सुरेश अवस्थी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, ग्वालटोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सरकारी शाळेत मतदान सुरु होते. भाजपाच्या पोलिंग एजंटसोबत जनार्दन दुबे यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप आहे. सुरेश अवस्थी यांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर जनार्दन दुबे यांच्याशी त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी महापौरांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पण सध्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिस अधिकारी जनार्दन दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन्स मतदान केंद्रावर एका पोलिस कर्मचाऱ्याला तैनात करण्यात आले होते. सुरेश अवस्थी यांचे समोरच घर असून, ते काही लोकांनी मतदान केंद्रावर पाठवत होते. यामुळे मतदान यादीवर वाद झाला. वाद वाढू लागल्याने मी तिथे पोहोचलो होतो. सुरेश अवस्थी तीन ते चार जणांना सोबत घेऊन आले आणि मला धमकी देऊ लागले. 'तू माझ्या हिटलिस्टमध्ये आहे, आज मतदान होऊ दे उद्या बघतो तुला', अशा शब्दांत त्यांनी मला धमकावले.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com