आपण पंतप्रधानांची स्तुती केली नाही : थॉमस

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले प्रशासक असल्याची स्तुती आपण केली नसल्याचा खुलासा आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार के. व्ही. थॉमस यांनी केला. यासंदर्भात दिलेल्या खुलाशाच्या पत्रात थॉमस यांनी म्हटले आहे की, मोदी हे चांगले प्रशासक नसल्याचे म्हटले आहे. येथील एका कार्यक्रमात थॉमस यांनी पंतप्रधान चांगले प्रशासक असून, ते आपल्या निर्णयांची माहिती सहकाऱ्यांना देतात, असे म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

मी काय म्हटले होते पंतप्रधान मोदी यांचे नोटाबंदी, जीएसटी यांसारखे अनेक निर्णय हे चुकीचे आहेत; मात्र ते सक्षमरीतीने व्यवस्थापन करीत आहेत, असे थॉमस यांनी म्हटल्याचे स्पष्ट केले. थॉमस हे संसदीय लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष आहेत. आपले व्यवस्थापन कौशल्य वापरून पंतप्रधान मोदी हे प्रसारमाध्यमांना मॅनेज करतात, ही वाईट परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.

Web Title: You did not praise the Prime Minister: Thomas