आप समर्थकांचे #AKSalutesIndianArmy

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वेळोवेळी देशासाठी रचनात्मक कार्य करून आपली राष्ट्रभक्ती दाखविली आहे, याचे दाखले देत केजरीवाल समर्थकांनी त्यांना सोशल मीडियावरून नामोहरम करू पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. #AKSalutesIndianArmy (अरविंद केजरीवालांचा भारतीय सेनेला सलाम) असा ट्रेंड ट्विटरवर आज (शुक्रवार) सर्वांत वर दिसू लागला आहे.

केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करण्याची मागणी केली होती. पाकमधील ट्विटर युजर्सनी ही मागणी उचलून धरली आणि ट्विटरवर काल (गुरुवारी) #PakStandsWithKejriwal असा ट्रेन्ड दिसू लागला होता. 

ट्विटराटींनी केजरीवाल यांचे जोरदार समर्थन करतानाच मोदी सरकारलाही धारेवर धरले. त्यामध्ये काही प्रतिक्रिया बोलक्या आहेत. वन रँक वन पेन्शन (OROP) या योजनेला भारतीय सेनाविरोधी असलेल्या मोदी सरकारने विरोध केला होता. मात्र, केजरीवालांनी त्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला, असे त्यामध्ये म्हटले आहे. 

एकीकडे मी सेनेला त्यांच्या ताकदीची जाणीव करून दिली असा टेंभा पर्रीकर मिरवत आहेत, तर दुसरीकडे केजरीवाल सैन्याला प्रणाम करतात असा चिमटा काहींनी काढला आहे.

‘अभाविप‘च्या कार्यकर्त्यांनी कालच केजरीवालांविरुद्ध घोषणाबाजी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर शाईदेखील फेकल्याची माहिती कोटे गाटे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक बिरबल यांनी सांगितले आहे. या प्रकरणी "अभाविप‘चे दिनेश ओझा आणि विक्रम सिंग या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: you supporters #AKSalutesIndianArmy