'कबीर सिंग' पाहिल्यानंतर तरुणाने केला प्रियसीचा खून; स्वत:ही केली आत्महत्या 

'कबीर सिंग' पाहिल्यानंतर तरुणाने केला प्रियसीचा खून; स्वत:ही केली आत्महत्या 

लखनौ : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाचं हिट झाला. या चित्रपटामध्ये अनोखी प्रेमकथा असल्याने हा चित्रपट तरुणांच्या खास पसंतीस उतरला. मात्र हाच चित्रपट पाहून एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचा खून केला असून स्वत:ही आत्महत्या केली आहे.

आश्विनी कश्यप असे तरुणाचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याला जेव्हा कळाले की, त्याच्या प्रेयसीचे दुस-या मुलासोबत लग्न होणार आहे. तेव्हा त्याने रागाच्या भरात तिचा खून केला व त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. हे करण्यापूर्वी त्याने 'जो मेरा नहीं हो सका उसे किसी और का होने का मौका नहीं दूंगा' यावर एक टिकटॉक व्हिडीओ देखील बनविला होता.

ही घटना चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डीवांगा यांना कळाली असता त्यांनी याबद्दल तरुणीच्या घरच्यांचे सांत्वन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com