स्मार्टफोनचं याड लागलं ! 

smartphone
smartphone

नवी दिल्ली - देशातील महाविद्यालयीन विद्यार्थी दिवसातून सरासरी 150 वेळा आपला मोबाईल फोन चेक करतात, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठ आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएसएसआर) केलेल्या पाहणीत ही बाब आढळून आली आहे. देशभरातील 20 केंद्रीय विद्यापीठांमधील चार हजार विद्यार्थ्यांनी या पाहणीत भाग घेतला होता. 

""एखाद्या माहितीपासून आपण वंचित राहू, अशी भीती या विद्यार्थ्यांना वाटते आहे. त्या भीतीपोटीच हे महाविद्यालयीन विद्यार्थी दिवसातून सरासरी 150 वेळा आपला मोबाईल फोन चेक करतात. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच अभ्यासावरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे,'' अशी माहिती या संशोधन प्रकल्पाचे संचालक मोहम्मद नावेद खान यांनी दिली. 

या अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी अवघ्या 26 टक्के विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, फक्त फोन कॉल करण्यासाठीच ते मोबाईलचा वापर करतात. बाकी इतर सर्वांनी सांगितले की, ते मोबाईलचा वापर सोशल नेटवर्किंगसाठी, गुगल वर घेतले जाणारे शोध आणि मनोरंजनासाठी करतात. 

अलिगड मुस्लिम विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले असून, त्यासाठी आयसीएसएसआरकडून निधी पुरविण्यात आला होता. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे स्मार्टफोनवरील अवलंबन आणि त्याचे व्यसन याचा या पाहणीत अभ्यास करण्यात आला. "स्मार्टफोनवरील अवलंबन, विलासवाद आणि खरेदीचे वर्तन ः डिजिटल इंडिया मोहिमेचे परिणाम' असे या संशोधन प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले होते. 

तीन किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी मोबाईलचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 14 टक्के आहे, तर मोबाईलचा प्रतिदिनी चार ते सात तास वापर करणाऱ्याऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 63 टक्के आहे. 
- सुमारे 80 टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वतःचा मोबाईल फोन आहे 
- विद्यार्थ्यांचे स्मार्टफोनला प्राधान्य 
- विविध फीचर आणि ऍपचा मोठ्या प्रमाणात वापर 
- वापरण्यास सोप्या मोबाईल फोनच्या निवडीला प्राधान्य 
- कॉम्प्युटरसाठी कमी खर्चिक पर्याय म्हणून मोबाईलची निवड 
- महत्त्वाचा वेळ मोबाईल वापरण्यात गेल्यामुळे त्याचा अभ्यासावर परिणाम 
- मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम 


दररोज आठ तासांपेक्षा अधिक काळासाठी मोबाईलचा वापर करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या 23 टक्के एवढी मोठी असल्याचे वास्तव या अभ्यासातून समोर आले आहे. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. 
- मोहम्मद नावेद खान, प्रकल्प संचालक 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com