मणिपूरमधील युवती कमळाच्या देठापासून तयार करणार मास्क

इंफाळ - कमळाच्या देठापासून तयार केलेल्या धाग्यासह तोंगब्राम विजयशांती.
इंफाळ - कमळाच्या देठापासून तयार केलेल्या धाग्यासह तोंगब्राम विजयशांती.

इंफाळ - कमळाच्या देठापासून धागा व कापड तयार करणाऱ्या मणिपूरमधील विष्णेपूर जिल्ह्यातील तोंगब्राम विजयशांती (वय २७) ही युवती आता कमळाच्या त्याच भागापासून मास्क तयार करीत आहे. कमळाच्या देठापासून तयार केलेल्या कापडाला विदेशात मोठी मागणी आहे.

मणिपूरमधील प्रसिद्ध लोकटक जलाशयाच्या परिसरातील थंगा तोंगब्राम या गावात विजयाशांती राहते. असा वनस्पतिजन्य मास्क तयार करण्याचे काम तिच्यासह १५ महिला करीत असून आणखी २० जणी प्रशिक्षण घेत आहेत, असे तिने सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकटकमध्ये कमळे मोठ्या प्रमाणावर फुलतात. याचाच वापर करीत तिने कमळाच्या देठापासून धागा व कापड तयार करण्याचा स्टार्ट-अप उद्योग २०१८-१९मध्ये सुरू केला. गुजरातच्या प्रयोगशाळेने तिच्या या नावीन्यपूर्ण शोधावर मंजुरीची मोहोर उमटवली आहे.

वनस्पतिशास्त्राची पदवीधर आहे. ती म्हणाली, कमळापासून या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी मी प्रामुख्याने इंटरनेटवरून संशोधन केले. जगण्याचा एक स्रोत या संकल्पनेतून २०१७-१८ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. सध्या त्यांचा चमू पुरुषांची परंपरागत शाल आणि टाय तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे.

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमामधून व मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी विजयशांतीच्या या प्रयत्नांचे कौतुक केले होते. तिच्या नवोन्मेषातून कमळाची शेती व वस्त्रोद्योगाचा नवा मार्ग सापडला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com