हुतात्मा जवान औरंगजेबचे दोन्ही भाऊ लष्करात दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जवान औरंगेब यांचे दोन्ही भाऊ आज (मंगळवार) लष्करात दाखल झाले.

श्रीनगर: काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जवान औरंगेब यांचे दोन्ही भाऊ आज (मंगळवार) लष्करात दाखल झाले. औरंगजेब यांच्या कुटुंबीयांनी देशासमोर एका नवा आदर्श ठेवला आहे.

औरंगजेब यांचे बंधू मोहम्मद तारीक आणि मोहम्मद शाबीर अशी त्यांची नावे आहेत. राजौरी येथे आज 100 जवानांना नव्याने लष्करात सामावून घेण्यात आले. यामध्ये मोहम्मद तारीक आणि मोहम्मद शाबीर यांचाही समावेश होता. या सोहळ्याला औरंगजेब यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान, औरंगजेब हे गेल्या वर्षी 15 जून रोजी ईद साजरी करण्यासाठी घरी जात होते. ते दक्षिण काश्मीरच्या शोपियानचे रहिवासी होते. घरी जाण्यासाठी लष्करी तळावरुन त्यांनी टॅक्सी पकडली होती. मात्र, दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता. सरकारने त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र पदक जाहीर केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Younger brothers of martyred soldier Aurangzeb join Indian Army