'त्या' एव्हरेस्टवीरेला आता सर करायचे आहे तीन दिवसात किलिमांजारो

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जुलै 2018

हरियाणाच्या शिवांगी पाठकने यावर्षी मे महिन्यात एव्हरेस्ट सर केला होता. त्यावेळी नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर करणारी ती भारतातील सर्वात कमी वयाची महिला ठरली होती. आता तिला तीन दिवसात आफ्रिकेतील किलिमांजारो हे शिखर सर करायचे आहे. 

नवी दिल्ली : नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतातील सर्वात लहान मुलीचा बहुमान मिळवणाऱ्या शिवांगीला आता आफ्रिकेमधील किलिमांजारो शिखर सर करण्याचा ध्यास लागला आहे. 

हरियाणाच्या शिवांगी पाठकने यावर्षी मे महिन्यात एव्हरेस्ट सर केला होता. त्यावेळी नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर करणारी ती भारतातील सर्वात कमी वयाची महिला ठरली होती. आता तिला तीन दिवसात आफ्रिकेतील किलिमांजारो हे शिखर सर करायचे आहे. 

 seven summits

एव्हरेस्ट सर केल्यानंतर तिने 18 वर्षे पूर्ण होण्याआधी जगातील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे व्यक्त केले होते. त्यातीलच किलिमांजारो हे एक शिखर आहे. हे शिखर फक्त तीन दिवसात सर करण्याचे तिचे ध्येय आहे. आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमांजारोची समुद्रसपाटीपासून उंची 5,895मीटर आहे. 

एका वाहिनीशी बोलताना ती म्हणाली, ''मला नेहमी सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी करुन दाखवायचे होते. त्यातच मी अरुनिमा सिन्हा यांचा व्हिडिओ पाहिला आणि मी पर्वतारोहण करण्याचा निर्णय घेतला. या सुंदर पृथ्वावरील सर्व पर्वत सर करण्याचे माझे ध्येय आहे.'' 

आपल्या कुटुंबाचे आभार मानताना ती म्हणाली, ''मुलींना त्यांची ध्येय गाठताना कुटुंबाला खूप पटवावे लागते. याउलट पालकांनी मुलींना संपूर्ण पाठिंबा द्यावा. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी मुलींना शक्य नाही.''

 

एव्हरेस्ट सर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही तिचे खूप कौतुक केले होते. शिवांगीने बेसिक आणि अॅडव्हान्स माउंटेनिअरिंगचा कोर्स पेहलगाममधील जवाहरलाल इन्स्टिट्युट ऑफ माउंटेनिअरिंगमध्ये केला आहे. 
 

Web Title: Youngest Indian Everest Climber wants to reach Kilimanjaro in just 3 days