Loksabha 2019 : 'राहुल गांधी तुमच्या वडिलांच्या कार्यकाळाची अखेर भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून'

Narendra Modi
Narendra Modi

प्रतापगड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. पण, मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी परस्परांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. चौकीदार चोर है अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. तर, आता मोदींनी राजीव गांधींवरही आरोप करत वैयक्तिक हल्ले करण्यास सुरवात केली आहे. 

शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे नरेंद्र मोदी बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी बोफर्स गैरव्यवहाराची देखील आठवण केली. 1980 मध्ये राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काळात बोफर्स गैरव्यवहार झाला. त्यानंतर काँग्रेसला सत्तेत येणे देखील कठिण झाले होते. देशाच्या विकासात व्यक्ती म्हणून गांधी घराणे कोणतेही योगदान देत नसल्याची टीका मोदी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com