राजीव गांधीच्या पुतळ्याला फासले काळे

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पंजाबमधील लुधियाना येथे युवा अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधींच्या पुतळ्याला शाई लावली असून हाताला लाल रंग दिला आहे. हाताला लाल रंग लावून राजीव गांधीला खूनी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लुधियाना- पंजाबमधील लुधियाना येथे युवा अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधींच्या पुतळ्याला शाई लावली असून हाताला लाल रंग दिला आहे. हाताला लाल रंग लावून राजीव गांधीला खूनी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना 1984 मधील शिख विरोधी दंगलीप्रकरणी नुकतीच शिक्षा झाली. त्यानंतर देशातील शिख समाजाकडून काँग्रेस विरोधात रोष प्रकट करण्यात येत आहे. अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी 1984 च्या शिख दंगली प्रकरणी राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे.

पंजाबमधील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. राजीव गांधी यांच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होइल, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याची दुधाने स्वच्छता केली आहे.

Web Title: Youth Akali workers deface Rajiv Gandhi bust