CAA बद्दल अफवा पसरवून युवकांची दिशाभूल : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 12 जानेवारी 2020

सीएए हा कायदा नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे. सरकारने एका रात्रीत कोणता कायदा केला नाही. देशात याबद्दल बरीच चर्चा झाली. पण याबाबत तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. या कायद्यानुसार कोणत्याही देशातील व्यक्ती जो भारताशी प्रामाणिक आहे तो भारताचा नागरिक होऊ शकतो.

कोलकता : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (CAA) अफवा पसरवून देशातील तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा व दिशाभूल करणारा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. आज (रविवार) स्वामी विवेकानंद यांची जयंती असून, रामकृष्ण मिशनचे मुख्यालय असलेल्या बेलूर मठात जाऊन मोदींनी ध्यानधारणा केली. शनिवारी कोलकात्यात पोहचल्यानंतर ते बेलूर मठातच थांबले होते. कोलकता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. कोलकता पोर्ट ट्रस्टचे नाव बदलून श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असे करण्यात आले आहे. या कार्यक्रमा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. ममता बॅनर्जी यांनी सीएए आणि एनसीआरची अंमलबजावणी करण्यास विरोध केलेला आहे.

मोदी म्हणाले, की सीएए हा कायदा नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे. सरकारने एका रात्रीत कोणता कायदा केला नाही. देशात याबद्दल बरीच चर्चा झाली. पण याबाबत तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. या कायद्यानुसार कोणत्याही देशातील व्यक्ती जो भारताशी प्रामाणिक आहे तो भारताचा नागरिक होऊ शकतो. यामुळे कोणाचं नागरिकत्व काढून घेतलं जात नाही तर दिलं जात आहे. देशातील तरुणांकडून भारतालाच नाही तर जगालाही मोठ्या अपेक्षा आहेत. पाकिस्तानमध्ये इतर धर्मातील लोकांवर अत्याचार होतो त्यावरही आपले तरुण आवाज उठवत आहेत. काही लोकांना जाणूनबुजून समजून घ्यायचे नसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth being misguided by rumours on CAA says Narendra Modi