'तू माझी नाही तर कोणाचीच होऊ शकत नाही...'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मी तु्झ्यावर खूप प्रेम करतोय. पण, तू माझी होऊ शकत नसशील तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणत प्रियकराने प्रेयसीची ठेचून हत्या केल्याची घटना येथे घडली. याप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कानपूर (उत्तर प्रदेश): मी तु्झ्यावर खूप प्रेम करतोय. पण, तू माझी होऊ शकत नसशील तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणत प्रियकराने प्रेयसीची ठेचून हत्या केल्याची घटना येथे घडली. याप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

देहात जिल्ह्यातील अकबरपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. पण, पोलिस ठाण्यामधून त्याने पळ काढला. पोलिसांनी चार तासानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेतले आहे.

शशिकांत गुप्ता व रोशनीचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमाबद्दल घरच्यांनाही माहिती होती. रोशनीच्या वडिलांनी बदनामी होऊ लागल्यामुळे तिला नोएडा येते नातेवाईकांकडे पाठवले होते. रोशनी तिथे नोकरी करत होती. दिवाळी निमित्त ती गावाला आली होती. शशिकांतने रात्री अकराच्या सुमारास रोशनीला ग्रामपंचायतीजवळ भेटायला बोलावले. यावेळी तिने आपण परत नोएडा येथे जाणार असल्याचे सांगितले. तो नकार देऊ लागल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भांडणानंतर शशिकांतने रोशणीची फरशीने ठेचून हत्या केली. शिवाय, डोळेही फोडले. या घटनेनंतर तो फरार झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, रोशनीची हत्या केल्यानंतर शशिकांतला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास करत आहोत. तपासादरम्यान त्याने सांगितले की, 'रोशनीवर माझे खूप प्रेम होते. पण, आमचा विवाह होत नसल्यामुळे व ती माझ्यापासून दूर गेल्यामुळे भांडण झाले. रोशनी माझी नाही तर दुसरी कोणाचीच देणार नव्हतो, म्हणून तिची हत्या केली.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth killed girlfriend for love at akbarpur area of kanpur up